मुंबई : अवघ्या देशातच इंधन (पेट्रोल, डिझेल) दरवाढीने जनता त्रस्त आहे. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा आज (मंगळवार, २९ मे) चक्क १६ वा दिवस. पण, १६व्या दिवशीही हे दर उतरतील ती महागाई कसली? आपला कारभार जनतेला आवडत असल्याचे ढोल भलेही केंद्रापासून राज्यापर्यंत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पिठत असले तरी, वास्तव मात्र भयान आहे. देशात आणि पर्यायाने राज्यात वाढत असलेले पेट्रोल - डिझेलचे दर पाहता सर्व काही अलबेल चालले आहे, असे चित्र मुळीच नाही. गेले १५ दिवस वाढत असलेले दर आणखी किती काळ असेच राहणार की यापेक्षाही वाढणार याबाबत कोणालाच काही सांगता येईना. या दरवाढीचा फटका सर्वसामान्य जनतेला तर बसत आहेच. पण, इंधन दरवाढीच्या झळांनी आता सर्वाजनिक वाहतूक सेवाही महागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल - डिझेल दरांवर टाकलेला हा एक कटाक्ष....


राज्यातील प्रमुख शहरे आणि पेट्रोल-डिझेलचे दर (हे दर प्रतिलिटर आहेत. तसेच, इथे दिलेले दरांचे आकडे आणि प्रत्यक्ष दर यात काहीसा फरक येऊ शकतो.) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर
पेट्रोल ८६. ३८ रुपये
डिझेल – ७२. ८३ रुपये


पुणे
पेट्रोल – ८६. ०३ रुपये
डिझेल – ७२. ४७ रुपये


ठाणे
पेट्रोल – ८६. ३२ रुपये
डिझेल – ७३. ८७ रुपये


नागपूर
पेट्रोल – ८६. ७२ रुपये
डिझेल – ७४. ३२ रुपये


नाशिक
पेट्रोल – ८६. ५७ रुपये
डिझेल – ७२. ९९ रुपये


औरंगाबाद
पेट्रोल – ८७. २२ रुपये
डिझेल – ७४. ७८ रुपये


दरम्यान, इंधनदर कमी करण्यासाठी आम्ही वेगवेगळया पर्यायांचा विचार करत आहोत, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ४ दिवसांपूर्वी सांगितले होते. पण, हे पर्याय सापडल्याचे कोणतेही चित्र सध्यातरी दिसत नाही.