मुंबई : पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत. गेल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये पेट्रोल २.३९ रुपये प्रति लीटर वाढली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत स्वस्त होत आहे पण रुपयाच्या किंमतीत घसरण झाल्याने परदेशातून पेट्रोल खरेदी करण्यास जास्त खर्च होत आहे.मुंबईत आज डिझेलची किंमत ७४.४६ तर पेट्रोलची किंमत ८६.०९ रुपये झाली आहे.


शहर आणि किंमत 


 शनिवारी म्हणजे आज दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये डिझेलच्या किंमती अनुक्रमे ७०.४२ रुपये, ७३.२७ रुपये, ७४.४६ रुपये आणि ७४.४१ रुपये तर पट्रोलची किंमत अनुक्रमे ७८.६८ रुपये, ८१.६० रुपये, ८६.०९ रुपये आणि ८१.७५ रुपये आहे.