मुंबई : पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलण्यास मनाई केली, याचा राग आल्यानं एका व्यक्तीनं पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना मुंबईत घडलीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोल पंपावर मोबाईल वर बोलण्यास मनाई करण्यात येते कारण यामुळे मोबाईलच्या लहरींमुळे तेही स्फोट होण्याची शक्यता असते. याच कारणावरून पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला जबर माराहण केल्याची घटना चेंबूर येथे घडली आहे.


चेंबूर येथील एका पेट्रोल पंपावर मंगळवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास एक स्कुटी चालक आपल्या मित्रासोबत पेट्रोल भरण्यास आला. त्याचा साथीदार फोनवर बोलत होता. त्याला या कर्मचाऱ्याने मोबाईल बोलायचे असल्यास बाहेर जाऊन बोला, अशी विनंती केली असता दुचाकीस्वाराला त्याचा राग आला... आणि त्यानं पेट्रोल पंप कर्मचाऱ्यास मारहाण करायला सुरुवात केली. 


त्यानं एवढ्यावरच न थांबता आपल्या इतर सात साथीदारांना बोलावून पुन्हा कर्मचाऱ्याला मारहाण केली. हा सर्व प्रकार पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.


पोलिसांनी या वादात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता त्याचंही या गुंडांनी ऐकण्यास नकार दिला. अखेर पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिलीय.