प्रशांत अंकुशराव मुंबई : बाजारातून चकाकणारं फळ घेण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. कारण ही चकाकी तुम्हाला धोका देऊ शकते, ज्याचा तुमच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. कारण फाळांना चकाकी देण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे केमिकल वापरले जाते. या केमिकलचा आपल्या शरीराला खूप मोठा धोका आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे विशिष्ट केमिकल म्हणजे PGR. या PGR ची रासायनिक प्रक्रिया फळांबरोबर भाज्यांवर देखील केली जाते. असे केल्याने फळं आणि भाज्या ताज्या दिसतात. ज्याला ग्राहकांनाकडून चांगले पैसे देखील मोजले जातात. परंतु अशा भाज्या घेण्यापूर्वी ग्राहकांनी सतर्क राहिले पाहिजे. यासंपू्र्ण परिस्थितीचा आढावा झी 24 तासचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी घेतला आहे.



PGRमध्ये फळांना  1 ते 2 मिनिटांसाठी ठेवले जाते, त्यानंतर त्यांना बाहेर काढून कपड्याने पुसले जाते. ज्यामुळे या फळांना चकाकी मिळेते आणि भाज्या ताज्या ठेवण्यात देखील मदत मिळते.


या प्रकरणा संदर्भात मुंबईच्या अन्न आणि औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता. असा प्रकार अजून तरी मुंबईतुन समोर आला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, असे प्रकार पुढे घडू नयेत यासाठी देखील आम्ही डोळयात तेल घालून लक्ष ठेऊ. त्यामुळे नागरीकांना काळजी करु नये.