Pitru Paksha 2022 : पत्नी हयात असतानाही 50 पतींकडून त्यांचं पिंडदान, Video मधून धक्कादायक कारण समोर
हयात असणाऱ्या पत्नींचं पिंडदान करणारे हे सर्वजण या निर्णयावर का पोहोचले, पाहा Video...
Pitru Paksha 2022 : सध्या सुरु असणाऱ्या पितृपक्षाच्या काळात अनेकजणांच्या कुटुंबांकडून हयात नसलेल्या सदस्यांसाठी श्राद्ध घालण्यात येत आहे. पितरांच्या नावे जेवणाचं पान ठेवत त्यावर त्यांच्या आवडीचे पदार्थ मांडले जात आहेत. पण, सध्या मुंबईत मात्र एका विचित्र प्रकारच्या दृश्यानं अनेकांनाच हादरवून सोडलं आहे. कारण, इथं तब्बल 50 पुरुषांनी त्यांच्या हयात असणाऱ्या पत्नीचंच पिंडदान केलं आहे. (pitru paksha 2022 shocking 50 husbands in mumbai did pind daan shocking video )
आपल्या पत्नीचं जीवंतपणी श्राद्ध घालत पत्नीच्या वाईट आठवणींवर या पतींनी पाणी सोडलं आहे. मुंबईतील (Mumbai) बाणगंगेकाठी त्यांनी हे पिंडदान केलं आहे. हे पीडित पती घटस्फोटित असल्याचंही सांगण्यात येत आहे.
काहींना पत्नीनं सोडलंय, काहींच्या कोर्टातल्या फेऱ्या सुरु आहेत. या सर्व परिस्थितीत पत्नीकडून आपला छळ झाल्याच्या भावनेनं त्यांनी हे पिंडदान केलं आहे. महिला असल्याचा फादया घेत पत्नीनं छळ केल्याचा आरोप या पतींनी केला आहे. वास्तव फाऊंडेशनच्या पुढाकारानं या पुरुषांनी हे पाऊल उचललं आहे. (Husband wife relationship)
वाचा : Pitru Paksha 2022 : पितृपक्षात 'अशा' परिस्थितीत कावळे दिसल्यास भरभराट होणार की आणखी काही?
पिंडदानाच्या वेळी एका पुरुषानं केशवपन केलं, तर इतरांनी पिंडदानाची पूजा केली. सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील हे पहिलंच प्रकरण असावं जिथं पत्नी जिवंत असतानाही त्यांच्या नावानं पिंडदान करण्यात आलं आहे.