आरे वसाहतीतल्या मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा
आरेच्या जमिनीवरच मेट्रो सातची कारशेड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई : आरेच्या जमिनीवरच मेट्रो सातची कारशेड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अंधेरी ते दहीसर मेट्रो प्रकल्पासाठी आरे वनक्षेत्रातली ५ एकर जागा नगरविकास विभागानं एमएमआरडीएकडे हस्तांरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आरे दुग्धवसाहतील जमीन महसूल आणि वन विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यानंतर ती एमएमआरडीला हस्तांरित करण्यात येणार आहे. या जागेत मेट्रो भवन, मेट्रो प्रकल्पाचे रिसिव्हिंग सबस्टेशन, स्टील यार्ड, लेबर कँपसाठी जागेचा वापर होणार आहे. या जागेत मेट्रो भवनही उभारले जाणार आहे. आरे दुग्धवसाहतीतील जमीन कारशेडला देण्यास पर्यावरण प्रेमींचा सक्त विरोध आहे. पण सरकारनं हा विरोध बाजूला ठेऊन मेट्रोसाठीची कारशेड आरेच्याच पाच एकरात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.