मुंबई : मंत्रालयात यापुढे पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मंत्री, सचिव, इतर कार्यालयांमध्ये पिण्याचं पाणी हे एकतर कुलरद्वारे किंवा काचेच्या बाटलीतून मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रालयात आता प्यायचे पाणी हे काचेच्या बाटलीतून दिले जाणार आहे. ठाकरे सरकारने असा निर्णय घेतला आहे. मंत्रालयातील प्लास्टिक बॉटल्स आता पूर्णपणे हद्दपार होणार आहेत. मंत्रालयातील कँटिन, अधिकारी आणि मंत्र्यांच्या दालनात देखील आता काचेच्या बाटल्या दिसत आहेत. 


२०१८ महाराष्ट्रात युतीच्या सरकराने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला होता. पण मंत्रालयात पिण्याच्या पाण्यासाठी २५० एमएलची प्लास्टिक बॉटल्स वापरण्याची परवानगी दिली होती. पण आता ठाकरे सरकारने प्लास्टिकची बॉटल हद्दपार केली आहे.