PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी मुंबई दौऱ्यावर असून 2024 या वर्षामध्ये मुंबई दौऱ्याच्या निमित्तानं त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भूमीत प्रवेश केला आहे. मुंबईमध्ये पंतप्रधान यावेळी आरबीआयच्या एका कार्यक्रमात सहभागी होणार असून, त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. सोमवारी शहरात पंतप्रधान येत असल्यामुळं 1 एप्रिल रोजी मुंबईतील वाहतूक पोलिसांच्या वतीनं वाहतुकीसंबंधीच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यानुसार सकाळी 7 वाजल्यापासून हे नियम लागू असून, दुपारी 2 वाजेपर्यंत शहरातींल मुख्य रस्त्यांवरी वाहतुकीच्या अनुषंगानं लागू असतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाहतूक शाखेच्या माहितीनुसार शहरातील इंदु क्लिनिक जंक्शन (सैय्यद जमादार चौक) पासून वोल्गा चौकापर्यंत रामभाऊ साळगावकर रस्त्याच्या विस्तार पाहता दोन्ही दिशांच्या वाहनांसाठी प्रवेश खुला असेल. याशिवाय जमनालाल बजाज मार्ग ते उषा मेहता चौकापर्यंत मेकर टॉवर 4 पर्यंतचा भाग दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी खुला असेल. शहरातील खालील महत्त्वाच्या रस्त्यांवर पार्किंगचे निर्बंध दुपारी दोन वाजेपर्यंत लागू असतील. 


हेसुद्धा वाचा : Loksabha Election 2024 : महायुतीत 'या' चार जागांचा तिढा सुटेना; वर्षावर पहाटेपर्यंत बैठकांची सत्र 


 


  • शहीद भगतसिंग रोड

  • नाथालाल पारेख रोड

  • कॅप्टन प्रकाश पेठे रोड

  • रामभाऊ साळगावकर रोड

  • जनरल.जगन्नाथ भोसले रोड

  • मादाम कामा रोड

  • बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग

  • जमनालाल बजाज मार्ग

  • विनय के शाह मार्ग

  • रामनाथ गोएंका मार्ग

  • दोराबाजी टाटा रोड

  • एनसीपीए मार्ग

  • नेताजी सुभाष चंद्र बोस मार्ग

  • वीवी राव मार्ग

  • बेस्ट मार्ग 



आरबीआयच्या कार्यक्रमासाठी अर्थात देशातील सर्वोच्च बँकेच्या 90 वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान मोदी मुंबईच्या कुलाबा येथे असणाऱ्या आयएनएस शिकरा या नौदल तळावरून रस्ते मार्गानं आरबीआय इमारतीपर्यंत जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आरबीआयच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे असून महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि इतर मान्यवरांची हजेरी असेल.