मुंबई : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील आयआयटीच्या ५६ व्या वार्षिक पदवीदान समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले. यावेळी पंतप्रधान मोदींनी 'आयआयटी मुंबई' या शिक्षण संस्थेला १ हजार कोटींची आर्थिक मदत जाहीर केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

५६ व्या पदवीदान समारंभात भाषणादरम्यान मोदींची ही घोषणा केलीय. यावेळी त्यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांचं तोंडभरून कौतुकही केलंय. आयआयटी विद्यार्थ्यांचा जगभरात डंका वाजतोय... यामुळेच स्टार्ट अप क्षेत्रात भारत दुसऱ्या स्थानी आहेत तसंच आयआयटी विद्यार्थी देशसेवेसाठी सक्रीय आहेत, असं म्हणत त्यांनी आयआयटीचा देशाच्या विकासाला हातभार लागत असल्याचं म्हटलंय. 


आयआयटीचा पदवीदान समारंभ पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुंबई आयआयटीतील 'डिपार्टमेंट ऑफ एनर्जी सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग' आणि 'सेंटर फॉर एन्व्हायरमेंटल सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग'च्या नवीन वास्तूचे उदघाटन होणार आहे.