मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचं उदघाटन झाले. मुंबईतील पेडर रोड परिसरात हे भव्य चित्रपट संग्रहालय उभारण्यात आले आहे. हे संग्रहालय उभारण्यासाठी १४१ कोटी रुपये खर्च आला आहे. या संग्रहालयातून भारतीय चित्रपटांचा शंभर वर्षांचा इतिहास उलगडला जाणार आहे. या संग्रहालयात भारतीय चित्रपटाशी संबंधित दृश्यं, शिल्प, ग्राफिक्स, भारतीय चित्रपटाविषयी किस्से आणि कथा यांचे सादरीकरण यांचा संग्रह आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्या मार्गदर्शनात संग्रहालयाचं काम करण्यात आले आहे. 




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमप्रसंगी मोदींनी चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्तींशी संवाद साधला. सरकार पायरसीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यादृष्टीने काम सुरु आहे, असे मोदी म्हणालेत. यावेळी मोदींनी उरी चित्रपटातील डायलॉगदेखील मोदी यांनी बोलून दाखवला. 'हाऊ इज द जोश?' 



मोदींनी 'हाऊ इज द जोश', म्हणताच उपस्थितांनी 'हाय सर' म्हणत प्रतिसाद दिला. तुमच्या या नव्या जोशाची सध्या देशात सर्वत्र चर्चा आहे. नव्या भारतासाठी तुमचा हा जोश खूप महत्वाचा आहे, असे मोदी म्हणालेत.