मुंबई : कमला मिल अग्नितांडव प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आलीय. अटक करण्यात आलेल्या दोघांमध्ये वन अबव रेस्टो पबच्या मॅनेजर्सचा समावेश आहे. या दोघांना ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी ही कारवाई केलीय. केवीन बाबा आणि लोप्स या दोन मॅनेजर्सना ही अटक करण्यात आलीय. कमला मिल परिसरात मोजो रेस्ट्रो आणि वन अबव्ह या रेस्टो पबला लागलेल्या आगीत चौदा जणांचा बळी गेला होता. 


कलम ३०४ म्हणजे सदोष मनुष्य वध हे कलम या प्रकरणातून रद्द करावे कारण आग लागलीये जाणीवपूर्वक लावण्यात आली नाही, असा युक्तीवाद आरोपींच्या वकीलांकडून करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा हा युक्तीवाद फेटाळून लावला.