Prime Minister Narendra Modi Tour in Mumbai : राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.(Politics News) त्यानंतर शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपचे  (BJP) सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. या महासत्तांतरानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच मुंबईत दाखल होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) 19 तारखेला मुंबई (Mumbai) दौऱ्यावर येत आहेत.  (Maharashtra Political News ) यासाठी भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.


मोदींच्या स्वागतासाठी भाजपची जोरदार तयारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महासत्तांतरानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच मुंबईत दाखल होत असल्याने मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपची जोरदार तयारी सुरु केली आहे. आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर होणार महत्वपूर्ण बैठक होत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्रभूमीवर मोदींचा दौऱ्याला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.


मुंबईतील सर्व आमदार आणि पदाधिकार्यांची महत्वपूर्ण बैठक


मोदी स्वागतासाठी आज भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेत्या मुंबईतील सर्व आमदार आणि पदाधिकार्यांची महत्वपूर्ण बैठक होत आहे. संध्याकाळी 8.30 वाजता सह्याद्रीवर ही बैठक होणार आहे. महासत्तांतरानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच मुंबईत दाखल होणार असल्याने मोदी काय बोलणार याचीही उत्सुकता आहे. तर दुसरीकडे मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपची जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून यानिमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने व्युहरचना आखण्यावर दोन्ही बाजुकडून प्रयत्न असणार आहे. त्यासाठी शिंदे आणि फडणवीस यांच्या उपस्थित बैठक होत आहे.