दीपक भातुसे / मुंबई : कोविड-१९चे संकट पूर्ण जगावर आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही. विरोधी पक्षाच्या काही सूचना  असतील तर त्या केल्या पाहिजेत. राजकारण करायला खूप वेळ आणि वाव आहे. आता नियोजन करुन लोकांनचा जीव वाचवायला पाहिजे, असा जोरदार टोला विरोधी पक्ष भाजपला शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या एक आठवडा आधी घेतला. त्याचे अनुकरण केंद्राने केले, असे मी म्हणणार नाही, पण राज्याने कोविडबाबत घेतलेल्या अनेक निर्णयांचे अनुकरण अनेक राज्यांनी केले आहे.  फिल्डवर सगळे मंत्री फिरतायत, मी स्वतः फिरतोय, आरोग्यमंत्री फिरत आहेत.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनेक बैठका घेऊन योग्य वेळेस योग्य निर्णय घेत आहेत.  त्यामुळे विरोधक जे आरोप करतायत त्यात कुठलेही तथ्य नाही. आरोपाचे राजकारण करण्याची ही वेळ नाही, असे थेट हल्लाबोल शिंदे यांनी विरोधकांवर केला. 


विरोधी पक्ष भाजप आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर हे सातत्याने महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकावर आरोप करत आहे. हे सरकार काहीही करत नाही. कोविड-१९ बाबत सरकार अपयशी ठरत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, असा आरोप करण्यात येत आहे. त्याला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. 


 विरोधी पक्षाला काही सूचना करायच्या असतील तर त्यांनी जरुर कराव्यात. कोरोनाच्या आडून राजकारण करु नका. आता नियोजन करून लोकांचा जीव वाचवायला पाहिजे. सगळ्यांनी यावर काम करण्याची गरज आहे, राजकारण करण्याची वेळ नाही.  मुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतायत, त्यामुळे मुंबईतील कोरोनाचे संकट कमी झाले आहे, मृत्यूचं प्रमाण खाली आलेले आहे. MMR, पुणे या भागावर देखील लक्ष केंद्रीत केलेले आहे, ज्या उपाययोजना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केल्या जात आहेत. राज्यात अनेक शहरात जम्बो कोविड फॅसिलिटी सेंटर उभे करतोय, हे निर्णय मुख्यमंत्रीच घेत असतात, त्यामुळे विरोधकांच्या आरोपात तथ्थ नाही, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले.