मुंबई : सगळ्याच राजकीय पक्षांचा राजकारणाचा आवडता विषय सावरकर. भाजपनं जाहीरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केल्यानंतर पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर नसते तर १८५७ चा उठाव झालाच नसता, असं अमित शाहा वाराणसीतल्या रॅलीमध्ये म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसचा सावरकरांना विरोध नाही, त्यांच्या विचारसरणीला आहे, असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांनी स्पष्ट केलं आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी सावरकरांच्या टपाल तिकिटाचं अनावरण केलं होतं, याचा दाखलाही यावेळी मनमोहन सिंगांनी दिला.


काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजपावर निशाणा साधलाय. तर सावरकरांना भारतरत्न देणं हा भगतसिंगांचा अपमान आहे, असं कन्हैय्याकुमारनं म्हटलं आहे.


सावरकरांच्या भारतरत्नाच्या मागणीचा उल्लेख जाहीरनाम्यात होताच विरोधकांना खुमखुमी येते...आणि  निवडणुकीच्या तोंडावर या वादाला आणखी फोडणी मिळते.