टपाल विभागाचाही सुटकेचा निश्वास
गेल्या 4 दिवसांपासून सुरु असलेल्या संपामुळे एकही टपाल आलं नाही. तसंच पोस्ट कार्यालयात आलेली टपालंही तिथेच पडून होती.
मुंबई : ग्रामीण भागातील रस्त्यांवर अधिराज्य गाजवणारी लालपरी तब्बल 4 दिवसांनंतर रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळे टपाल विभागाने सुटकेचा निश्वास सो़डलाय.
टपाल विभागाकडून सुटकेचा निश्वास
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सामान्य नागरिकांना ज्याप्रमाणे त्रास झाला, त्याप्रमाणेच अनेक सरकारी विभागांनाही या संपाचा फटका बसला. राज्यभरातून येणारी टपालं एसटीच्या माध्यमातून गावागावांत पोहोचवली जातात.
टपालं एसटीच्या माध्यमातून गावागावांत
मात्र, गेल्या 4 दिवसांपासून सुरु असलेल्या संपामुळे एकही टपाल आलं नाही. तसंच पोस्ट कार्यालयात आलेली टपालंही तिथेच पडून होती. आता एसटी सुरु झाल्यामुळे टपाल वाटपाचे काम पुन्हा सुरु झालं आहे.