प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायचे संकेत
भाजपला हरवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची रणनिती
मुंबई : भाजपविरोधात आघाडी उभारण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. वंचित बहुजन आघाडी स्थापन करून आगामी निवडणुका लढणार असल्याची घोषणा आंबेडकरांनी केलीय. पुरोगामी पक्ष म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सशर्त आघाडी करण्याला आंबेडकरांनी हिरवा कंदील दाखवलाय.
पवारांना आम्ही पुरोगामी समजतो पण त्यांनी काही प्रतिगामी भूमिका सोडाव्यात असा आग्रह आंबेडकरांनी धरलाय. तर दुसरीकडे शिवसेना पावसाळी अधिवेशनासाठी नागपूरला गेली नाही तर महाराष्ट्रात काश्मीर सारखी स्थिती उद्भवू शकते असं वक्तव्याही आंबेडकरांनी केलंय.