प्रकाश आंबेडकारांच्या आंदोलनाचे विधीमंडळात पडसाद
प्रकाश आंबेडकारांनी आझाद मैदानात केलेल्या आंदोलनाचे पडसाद विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात बघायला मिळाले.
मुंबई : प्रकाश आंबेडकारांनी आझाद मैदानात केलेल्या आंदोलनाचे पडसाद विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात बघायला मिळाले. विधानसभेत विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोरेगाव-भीमाच्या दंगलीनंतर सरकराच्या कारवाईवर टीकास्त्र सोडलं. तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला कारवाईचे निर्देश देण्याची अध्यक्षांना विनंती केली.
काय आहे मागणी
संभाजी भिडेंच्या अटकेच्या मागणीसाठी मुंबईत काढण्यात येणा-या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. पण पोलिसांचा आदेश नाकारून एल्गार मोर्चासाठी कार्यकर्ते सीएसएमटी स्टेशनवर जमा व्हायला सुरूवात झाली. दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याचे दिसून आले.
पाहा काय केली टीका
आठवलेंची प्रतिक्रिया
भीमा कोरेगाव प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांची मागणी रास्त असून संभाजी भिडे गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी खासदार रामदास आठवले यांनी केली.