मुंबई : प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आज महाआघाडीबाबत झालेली चर्चा निष्पळ ठरली आहे. जवळपास दोन तास चाललेल्या बैठकीतून कोणताच तोडगा निघालेला नाही. आघाडीबाबत चर्चा पुढे सरकली नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे. तर आंबेडकर आघाडीत सहभागी होतील याबाबत आपण आशावादी असल्याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. संघाने देशात समांतर व्यवस्थापन राबवले आहे, त्याऐवजी घटनात्मक व्यवस्थापन असावे अशी आमची मागणी असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं. घटनात्मक व्यवस्थापनाबाबत काँग्रेसची स्पष्ट भूमिका असेल तर तर चर्चा पुढे सरकेल असंही त्यांनी नमूद केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमसोबत निवडणुका लढवणार असल्य़ाची घोषणा केली आहे. काँग्रेससाठी आजही दरवाजे खुले आहेत. असंही त्यांनी म्हटलं होतं. पण काँग्रेसशी युती झाली तरी आम्ही एमआयएमला सोडणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं होतं. शरद पवार सेक्युलर आहेत पण त्यांचा पक्ष नाही. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत जाणं मंजूर नसल्याचं देखीस त्यांनी म्हटलं होतं. काँग्रेससोबतच आघाडी केली पाहिजे असं वाटतं पण काँग्रेस चर्चा करत नसल्याचंही आंबेडकर त्यावेळी म्हणाले होते. त्यानंतर मात्र आज ही भेट घडून आली.