महाविकासआघाडीत राष्ट्रवादीची कामे होतात, शिवसेनेला न्याय मिळत नाही: दरेकर
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी शिवसेना आमदारांची कामे होत नाहीयेत अशी व्यथा मांडली आहे.
पुणे : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी शिवसेना आमदारांची कामे होत नाहीयेत अशी व्यथा मांडली आहे. तर भाजप सोबत जुवळून घेण्यातच फायदा आहे. असं देखील म्हटलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा युतीची चर्चा सुरु झाली आहे. असं असताना आता यावर विविध प्रतिक्रिया देखील येत आहेत.
विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'प्रताप सरनाईक यांनी अनेक आमदारांची भावना व्यक्त केली आहे. महाविकासआघाडीत राष्ट्रवादीची कामे होतात. सरकारचा शिवसेनेला उपयोग होत नाहीये ही भावना व्यक्त झाली. सध्या शिवसेनेला न्याय मिळत नाही.'
स्वबळावर निवडणूक
पक्षात मतमतांतरे आहेत, नेत्यांची वेगवेगळे मत आहेत. नाना पटोले वेगळं सांगताय, तिकडे थोरात वेगळं सांगताय. एच के पाटील वेगळं सांगताय त्यामुळे एकमेकांचे पाय ओढत स्वबळावर लढू शकत नाहीत.
मुंबई निवडणूक
महाविकासआघाडीची निर्मिती झाली तेव्हाच स्वबळावर लढाईची तयारी केली. १०० टक्के आमची तयारी पूर्ण झाली आहे. शिवसेनेच्या आमदारांना शिवसेनेचा मुख्यमंत्री असतांना चातकाप्रमाने वाट पहावी लगतेय. फक्त राष्ट्रवादीचे काम होत असल्याची अनेक आमदार माझ्याकडे खंत व्यक्त करताय. अन्याय होतोय असाच अर्थ त्याचा होतो. असं देखील दरेकर यांनी म्हटलं आहे.
हिंदुत्व पेटंट
'हिंदुत्व सांगायची वेळ का येते. प्रत्येक पक्षाची विचारधारा आहे. शिवसेना प्रमुखांना हिंदूहृदय सम्राट म्हटलं जायचं. आता शिवसेनेच्या हिंदुत्व विषयी शंका निर्माण झाली.'
जेव्हा शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेली तेव्हा पासून माझा समज झालाय. राजकारणात काहीही होऊ शकतं. हे होईल ते होईल असं मी ठामपने सांगू शकत नाही. कार्यकर्ता म्हणून एका विचारसरणीचे लोक एकत्र येत असतील तर मी नाक मुरडण्याची आवश्यकता नाही.