मुंबई : महाराष्ट्रात अजून मान्सून दाखल झालेला नसला तरी मुंबई आणि उपनगरांमध्ये मान्सूनपूर्व सरींनी जोरदार हजेरी लावली. पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरू असल्यानं कामावर जाताना मुंबई आणि परिसरातल्या नागरिकांची कामाला जाताना तारांबळ उडाली.  


मध्य रेल्वे उशिरा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतही दुपारी मान्सूनपूर्व सरी बरसल्या आहेत. या पावसात कळव्याजवळ वीजपुरवठा खंडीत झाला आहे. परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने धावत आहे. मध्य रेल्वेच्या गाड्या सुमारे 15-20 मिनिटं उशिराने धावत आहेत. 


गोव्यात मान्सून दाखल 


महाराष्ट्रात मान्सून अजून दाखल झाला नसला तरीही मुंबईकर आज मान्सूनपूर्व पावसाने न्हाहून निघाली आहे. येत्या काही दिवसात महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होईल. 


१० आणि ११ जूनला कोकण, मुंबई आणि जवळच्या सर्व परिसरात अति मुसळधार पावसाच अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय... मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केलंय.