`थर्टी फर्स्ट`ची पार्टी करताना गडबड केलीत तर खैर नाही
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि थर्टी फस्टच्या पार्ट्या लक्षात घेता मुंबई पोलिसांनी मुंबईत महिलांसाठी चोख बंदोबस्त ठेवलाय. या सुरक्षिततेत महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाय योजना करण्यात आल्या आहेत. याकरता ३० हजार पोलीसांचा अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आलाय. विशेष म्हणजे ५०० पोलीस महिला छेडाछाड पथकातील संपूर्ण मुंबईत साध्या वेशात बार आणि पार्ट्यांमध्ये सहभागी होणार आहेत.
अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि थर्टी फस्टच्या पार्ट्या लक्षात घेता मुंबई पोलिसांनी मुंबईत महिलांसाठी चोख बंदोबस्त ठेवलाय. या सुरक्षिततेत महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाय योजना करण्यात आल्या आहेत. याकरता ३० हजार पोलीसांचा अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आलाय. विशेष म्हणजे ५०० पोलीस महिला छेडाछाड पथकातील संपूर्ण मुंबईत साध्या वेशात बार आणि पार्ट्यांमध्ये सहभागी होणार आहेत.
सेलिब्रेशनमध्ये बाधा आणणाऱ्या समाजकंटकांची यावेळी खैर नाही. मुंबई पोलीस त्यासाठी सज्ज आहेत. मुंबईत तब्बल 30 हजार पोलीस तैनात असणार आहेत. मुंबई पोलीसांचं ख़ास महिला छेड़छाड़ विरोधी पथक तैनात आहे. यात जवळपास 1 हजारपेक्षा अधिक पुरूष आणि महिला पोलीस साध्या वेशात पार्टीत सहभागी असतील.
महिला सुरक्षेला विशेष प्राधान्य
- ३ हजार ५५० पोलीस,
- ५५० महिला पोलीस,
- २० महिला पोलीस निरीक्षक,
- ७० सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
- ७० पोलीस निरीक्षक
- १२० सहाय्यक पोलीस निरीक्षक
- २ सहाय्यक पोलीस आयुक्त
याशिवाय स्थानिक पोलीस बंदोबस्तासाठी असणारच आहेत. सर्व पोलीसांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. लाखो मुंबईकर आणि बाहेरुन आलेले पर्यटक रात्रभर मुंबईत असणार आहेत. त्यासाठी बंदोबस्ताचा विशेष प्लॅन असेल. स्वत: मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर संपूर्ण रात्र जागता पहारा देणार आहेत. मुंबई पोलीस कंट्रोल रुम मधून ५००० पेक्षा जास्त कॅमे-यांच्या सहाय्याने प्रत्येक कोप-या लक्ष ठेवलं जाणार आहे. याशिवाय हरवलेल्या मुलांचा शोध घेणारं विशेष पथक, राज्य राखीव दलाच्या २ तुकड्या, ५०० होमगार्ड, ५५०० स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक, ५ ड्रोन कॅमेरे, रॅपीड अॅक्शन फोर्स, शीघ्र कृती दल तैनात असेल.
गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, वरळी सी फेस, बॅण्ड स्टॅन्ड तसच सर्व समुद्र चौपट्यांवर यंदा ३१ डिसेंबर या दिवशी दुपारी १२ ते दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजेपर्यंत गाड्यांना नो एन्ट्री करण्यात आलीय. तसंच सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास मनाई करण्यात आलीय.