हिंदूंची चेष्टा करणाऱ्या सरकारचा निषेध! प्रसाद लाड यांचं मुंडन आंदोलन
गुडीपाडव्याच्या शोभायात्रेला परवानगी मिळत नसल्याने प्रसाद लाड यांचं आंदोलन
मुंबई : गुडीपाडव्याच्या शोभायात्रेला परवानगी मिळत नसल्याने भाजप (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारचा निषेध करत प्रसाद लाड यांनी मुंडन आंदोलन केलं आहे.
गुडीपावडव्याला निघणाऱ्या शोभायात्रांना परवानगी द्यावी अशी मागणी भाजप नेत्यांनी राज्य सरकारकडे केली होती. पण राज्य सरकारकडून अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.
'हिंदूंच्या सणांची चेष्टा'
उत्सावाला बंदी घालत जमावबंदीचे आदेश लागू केले, त्याचा मी निषेध करतो, मराठी आणि हिंदू सणांना अशा प्रकारे बंदी घालून उद्धव ठाकरे सरकार आदिलशहा सरकारचं दर्शन देत आहेत का, असं हिंदूंना वाटायला लागलं आहे, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पूत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर काँग्रेसच्या मांडीवर बसून मराठा आणि हिंदूंची चेष्टा करतील असं कधीच आम्हाला वाटलं नव्हतं, याचा निषेध म्हणून मुंडन केल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.
आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर निशाणा
गुढीपाडवा आणि रामनवमी हे दोन्ही सण हिंदूंसाठी महत्वाचे आहेत. मात्र, हिंदूंच्या सणांबाबत राज्य सरकारची भूमिका सुस्पष्ट नाही. हिंदू सणांना परवानगी देताना यांच्या हाताला लकवा का मारतो हे कळत नाही, अशी टीका आशीष शेलार यांनी केली आहे.
रामभक्तांचा कार्यक्रम म्हटला की शिवसेनेची बोटचेपी भूमिका का येते, असा सवाल करतानाच या दोन्ही सणांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून परवानगी देण्यात यावी. यात खोड टाकू नये अशी मागणी त्यांनी केली.