मुंबई  :  रविवारी मुंबई - पुणे असा प्रवास करण्याचा तुमचा बेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे... ठाकूर्ली येथे गर्डर टाकण्याचे काम रविवारी होणार असल्याने मुंबई - पुण्याच्या रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिणामी काही गाड्या  रद्द तर काही  गाड्यांच्या वाहतुकीत बदल होणार आहेत. 


गर्डर टाकण्याचे काम रविवारी सकाळी सव्वा नऊ ते दुपारी पावणे एक दरम्यान करण्यात येईल.  परिणामी डेक्कन क्वीन, मनमाड मुंबई पंचवटी एक्स्प्रेस आणि गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत.


पुण्याहून मुंबईला जाणार्‍या  इतर गाड्यांना कर्जत, दिवा, पनवेल या मार्गावरून वळवले जाईल. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा या गाड्यांमध्ये १०-४० मिनिटं उशीर होण्याची शक्यता आहे. 


मुंबईहून कर्जत, लोणावळामार्गे जाणाऱ्या काही गाडय़ांच्या वेळेतही बदल करण्यात येणार आहे.  तसेच कल्याण स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांसाठी या गाडय़ा दिवा स्थानकावर थांबविण्यात येणार आहेत.