मुंबई : वरळी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या नव्या नेमणुकांवरून वाद पेटलाय. शाखा क्रमांक 199चे नवनियुक्त शाखाप्रमुख गोपाळ खाडे यांच्या नेमणुकीला स्थानिक शिवसैनिकांचा विरोध केलाय. राजेश कुसळे यांना पदावरून हटवल्यानं त्यांच्या समर्थकांमध्ये रोष आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नेमणुकीवरुन राजेश कुसळे विरुद्ध गोपाळ खाडे समर्थकांमध्ये राडा झाला. धोबीघाट गेट नंबर 14 च्या समोर शिवसैनिक एकमेकांना भिडले. यात दोन गंभीर जखमी झाले. त्यांना नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. दरम्यान, विभागप्रमुख आणि नगरसेवक आशीष चेंबूरकर यांना कुसळे समर्थकांनी सोमवारी शाखेबाहेर रोखलं. 


शिवसैनिकांच्या दोन गटांमध्ये राडा होऊ नये यासाठी सोमवारी शाखेबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चर्चेने वाद सोडवण्याचं पक्षनेतृत्वानं कुसळे समर्थकांना आश्वासन दिलंय. पण वाद सुटत नाही, तोवर शाखाप्रमुख गोपाळ खाडेंना शाखेत येण्यापासून मज्जाव करण्यात आलाय. तसा निर्धारच कुसळे समर्थक व्यक्त करतायत. 


कुसळे यांना गेल्या महापलिका निवडणुकीतही डावललं होते. तोही समर्थकांमध्ये राग आहेच. त्यांच्याऐवजी विभागाबाहेरच्या किशोरी पेडणेकर यांना संधी दिली होती. बेस्ट समितीवर कुसळेंचं पुनर्वसन करून पक्षनेतृत्वानं विभागातील डॅमेज कंट्रोल केलं. मात्र, गेली 19 वर्षे शाखाप्रमुख असलेल्या कुसळेंना पदावरून का हटवलं याचं उत्तर शिवसैनिक मागतायत.