मुंबई : राफेल प्रकरणामुळे देशाच्या मनात अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कितीही बाजू घेतली तरी काही फरक पडणार नाही, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. शिवसेनेनं कुठेही अजून वेगळी भूमिका घेतलेली नाही. प्रकरण प्राथमिक अवस्थेत आहे. JPC ची मागणी झालीय. शिवसेनेनं कुणाला क्लीनचिट दिलेली नाही, असे राऊत म्हणालेत. दरम्यान, गोंधळाचं राजकारण निर्माण करण्यात पवारांची हातोटी आहे, असा टोला त्यांनी पवारांना लगावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पवारा यांचे विधान सध्या जरी मोदींना तात्पुरती मदत करणारे दिसत असले तरी पवार भाजपसोबत जाणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे. शिवसेनेने कुणाला क्लीनचिट दिलेली नाही. शिवसेना लोकभावनेसोबत आहे. शिवसेनेनं कुठेही अजून वेगळी भूमिका घेतलेली नाही. प्रकरण प्राथमिक अवस्थेत आहे. JPC ची मागणी झालीय. शिवसेनेनं कुणाला क्लीनचिट दिलेली नाही, असे राऊत म्हणालेत.


भाजप आणि मोदींच्या बाजूनं उभे राहिलेला आशादायी सूर, पण तो फार काळ टिकणार नाही. शरद पवार यांचे विधान हे भाजप आणि मोदींना तात्पुरती मदत आहे. भाजपने संयम बाळगावा फार आरोळ्या ठोकू नयेत. बोफोर्सचा अनुभव लक्षात घ्यावा, असा भाजपला सल्ला देताना महिनाभराने पवारांचं खरं मत बाहेर येईल, असे राऊत म्हणालेत.


गेल्या चार वर्षांत दिसलं आहे की, जेव्हा नरेंद्र मोदी अडचणीत येतात, तेव्हा मध्यस्थीसाठी  पवार भूमिका घेऊन सांगण्याचा प्रयत्न करतात. तसेच गोंधळाचं राजकारण निर्माण करण्यात पवारांची हातोटी आहे. मात्र, पवार मोदींबरोबर जातील असं वाटत नाही. राफेल प्रकरणामुळे देशाच्या मनात अस्वस्थता आहे. पवारांनी मोदींची कितीही बाजू घेतली तरी काही फरक पडणार नाही. विरोधी पक्षातील इतर घटक पक्षांचे नेते अजून गप्प का ?


दरम्यान, राफेल प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ज्याप्रकारे सत्य बाहेर आणत आहेत, त्यामुळे ते देशात मोदींनंतर मोठे नेते झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची दखल घेतली जातेय, असे संजय राऊत म्हणालेत.