मुंबई : शिवसेना पदाधिकारी आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरावर आयकर विभागाचं (Income Tax) छापासत्र सुरु आहे. यावरुन भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राहुल कनाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आरोप केल्याने काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि आमदार नितेश राणे यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा नितेश राणे यांनी एक नवा दावा केला आहे.


दिशा सालिनय आणि अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या बाबतीत जी घटना घडली आहे, त्यामध्ये राहुल कनालचा तर हात नव्हता ना? सीडीआर चेक करायला हवं. 8 जूनला दिशाचा मृत्यू झाला त्या रात्री 9 तारखेला हा राहुल कुठे होता, याचा तपास करायला हवा असं आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे. 


नितेश राणे यांनी राहुल कनाल यांच्याबाबत अनेक खुलासे केले. जनतेचा पैसै कोण चोरी करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, हा डेंटिस्टचा मुलगा कसा काय एवढा पैसा कमावतो, राहुल कनाल हा आदित्य ठाकरे यांच्या नाईटलाईफ गँगचा भाग आहे असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. 


मुंबईतलं हर्बल हुक्का पार्लर हे राहुल कनाल याचं आहे, तसंच कॅफे बांद्रा नावाचं त्याचं एक रेस्टॉरंट आहे, संध्याकाळी सात नंतर तो कुणासोबत बसतो, संध्याकाळी सात नंतर तो कुणासोबत बसतो, त्याला शिर्डी ट्रस्टवर का पाठवलं असे अनेक सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केले आहेत. तसंच राहुल कनालकडे नेमका कुणाचा पैसा आहे याचा तपास व्हायला हवा अशी मागणीही नितेश राणे यांनी केली आहे. 


हे महाराष्ट्र विकणारे आहेत, महाराष्ट्र विकणाऱ्यांसमोर महाराष्ट्र कधी झुकणार नाही असा इशाराही नितेश राणे यांनी दिला आहे.