Rahul Narvekar On Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपावर राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी रोखठोक उत्तर दिलं आहे. त्यामुळं आता ठाकरे आणि नार्वेकरांच्या सलग पत्रकार परिषदांमुळं राजकीय चर्चांना उधाण आलंय. गल्लीबोळात होणारी भाषण होतं की महापत्रकार परिषद होती? असा सवाल उपस्थित करत राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका केलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संविधानिक संस्थांवर विश्वास नाही ते सगळे अविश्वास निर्माण केलं जात आहे. भरत गोगावले प्रतोद याबाबत निर्णय दिला तो चुकीचा दावा त्यांनी केलाय. सर्वोच्य न्यायालय आदेश वाचले तर स्पष्ट समजेल की, याविषयी म्हटलं आहे की, प्रतोद मान्यता देताना राजकीय पक्षाची भूमिका इच्छा समजून परवानगी द्यावी. माझ्या समोर प्रकरण आलं त्यावेळेस दोन गट पडल्याचं उघड होतं. सर्वोच्य न्यायालय सांगितलं की मूळ राजकीय पक्ष निश्चित करा. ज्यास पक्षास मान्यता देता त्याचे प्रतोद मान्य करा मग निर्णय द्यावं .कोर्टाने कधीच गोगावले निवड गैरकायम स्वरूपी कधीच म्हटलं नाही. मी केलेली कारवाही ही कोर्टाच्या आदेशाचं पालन करत केली आहे, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.


सर्वोच्य न्यायालय राजकीय पक्ष संविधान, विधीमंडळ बहुमत याचा विचार करून मूळ राजकीय पक्ष कोणाचा यांचे आदेश पालन करूनच निर्णय दिला. १९९८ घटना सेनेची मान्य पण २०१८ मान्य नाही, असं अध्यक्ष यांनी केलं असं वारंवार ते सांगतात, मात्र निवडणुक आयोगाकडे काय सादर केले त्याच आधारावर मी भूमिका घेतली. निवडणूक आयोगाकडे सेना घटनेत केलेले बदल नोंद ज्याचा संदर्भ मी घेतला, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.


माझ्यासमोर युक्तिवाद कुढंही २०१३ घटना बदल याविषयी दावे केले नाही, असं वक्तव्य नार्वेकर यांनी केलंय. यांनी २०१८ सालचे पत्र दाखवले. २०१८ मध्ये निवडीचा निकाल फक्त निवडणूक आयोगास कळवला आहे, पण सेनेत घटनेत कोणताही बदल केल्याचे निवडणूक आयोगास त्यांनी कळवले नाही. फक्त पत्र दाखवतात त्यात काय लिहीले हे का सांगत नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.


पत्र दाखवतात पण काय लिहीले ते सांगायचे नाही, झाकली मूठ सव्वालाख अशी स्थिती आहे, असं म्हणत नार्वेकर यांनी अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. परब यांनी पत्र दाखवलं होतं की, सेनेनी घटना निवड बदल निवडणूक आयोगास कळवलं आहे, पण नार्वेकर यांनी स्पष्ट सांगितलं त्यावेळेस निवड जाहीर केली. मी कार्यकर्ता म्हणून तिथं बैठकीत असेल ही पण संविधान बदल निवडणूक आयोगाकडे केला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.


उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?


दरम्यान, एखादा अध्यक्ष उघड बोलतो एकच पक्ष राहील. सर्व पक्ष संपून जाईल. ही घातक लढाई सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात लवादाने जो निकाल दिला त्याविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. पण त्याचबरोबर आम्ही जनतेच्या सर्वोच्च न्यायालयात आलो आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.