मुंबई : रेल्वे क्रॉसिंगवर (Railway crossing) आजही वाहनचालक निष्काळजीपणे वागत असल्याचे समोर आले आहे. रेल्वेचे गेट पडलेले असतानाही (Railway gates closed) एका तरुणाने बाईक घेऊन गेट पार करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात समोरुन भरधाव एक्स्प्रेस आली.(Railway Express) त्यानंतरचा प्रसंग अंगावर काटा आणणारा होता.(Railway Crossing Accident) एक्स्प्रेसची बाईकला धडक बसल्यानंतर बाईकचे तुकडे झालेले पाहायला मिळाले. मात्र, बाईकस्वार मागे झाल्याने त्याचा जीव वाचला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक तरुण रेल्वेचे फाटक बंद असताना आपली बाईक घेऊन फाटकमधून जाण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात भरधाव एक्स्प्रेस येत होती. त्याचे लक्ष गेल्यानंतर त्याची तारांबळ उडाली. त्याला काहीही कळत नव्हते. खाबरुन त्या तरुणांने रुळांशेजारीच बाईक टाकली. बाईक ओढून घेण्याची वेळही त्या तरुणाला मिळाली नाही, तोपर्यंत भरधाव एक्स्प्रेस बाईकला धडक देत निघून गेली. जिवावर बेतलं होतं बाईकवर निभावले असे म्हणण्याची वेळ तरुणावर आली होती. 


अनेकवेळा रेल्वेकडून रेल्वे रुळ ओलांडू नका, रेल्वेचे फाटक ओलांडून जाऊ नका, असे वारंवार आवाहन करण्यात येते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा बंद होती. मात्र, काही विशेष रेल्वे सुरु होत्या. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात घट दिसून आली. आता पुन्हा रेल्वे सेवा सुरु झाली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याने रेल्वेला गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे यापुढे रेल्वे रुळ ओलांडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.