सचिन गाड, झी मीडिया, मुंबई : आमदार, खासदार, बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट कगदपत्रे बनवून रेल्वे तिकीट कन्फर्म करणार्या एका सराईत ठकाला रेल्वे जीआरपीने अटक केली आहे. देवप्रताप चतुर्भुज सिंह असे या ठकाचे नाव असून तो घर बसल्या देशभरात कुठेही तिकीट तत्काळ आरक्षित करत होता... देवप्रताप सिंहचे प्रताप ऐकून तुम्हीदेखील चक्राऊन जाल... हा देवप्रताप कोणी मंत्री-संत्री किंवा व्हीआयपी व्यक्ती नसला तरी कुठल्याही भागातील तिकीट अगदी काही क्षणात 'व्हीआयपी' कोट्यातून कन्फर्म करून द्यायाचा...


असा चालायचा त्याचा धंदा... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कामासाठी देवप्रताप खासदार आमदार आणि वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर अगदी सर्रास करायचा... अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्राचे माजी अप्पर मुख्य सचिव के. पी . बक्षी तसेच लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांच्या नावाचा समावेश आहे.  


या प्रतापने खासदार आमदार आणि सनदी अधिकाऱ्यांची शिफारसपत्रे इंटरनेटवरून डाऊनलोड केली होती. ज्यावेळी एखादा दलाल याच्याकडे तिकीट कन्फर्म करण्यासाठी येत असे तेव्हा हा प्रताप ही शिफारसपत्रे पीएनआर नंबरसह रेल्वेच्या संबधीत विभागांना फॅक्स करायचा...  फॅक्स प्राप्त होताच त्यावरील नाव बघताच ही तिकिटे तत्काळ व्हीआयपी कोट्यातून कन्फर्म होत असत...


पोलिसांसमोर कोडं... 


विशेष म्हणजे फॅक्स करताना प्रताप काळजी घेई की फॅक्सवर त्या अधिकाऱ्याचाच फॅक्स नंबर असे... हे नेमकं तो कसं करत असे? हे पोलिसांसमोर अद्यापही कोडंच आहे.  गेल्या दोन वर्षांपासून प्रताप हे उद्योग करत होता आतात नेमक्या कणा कोणाचेया नावाचा प्रताप ने उपयोग केला आहे आणयाचा सध्या जीआरपी तपास करतेय.