मुंबई तीन तास ठप्प... प्रशासन झोपलेलंच!
तीन ते चारवर्ष प्रशिक्षण घेतलेल्या हजारो प्रशिक्षणार्थींना कायम नोकरीत घ्यावं, या मागणीसाठी आज देशभरातले विद्यार्थी माटुंगा आणि दादर स्थानकादरम्यान रुळावर उतरलेत. मागील तीन तासांपासून लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. पण, अजूनही प्रशासन झोपलेलंच असल्याचं दिसतंय.
मुंबई : तीन ते चारवर्ष प्रशिक्षण घेतलेल्या हजारो प्रशिक्षणार्थींना कायम नोकरीत घ्यावं, या मागणीसाठी आज देशभरातले विद्यार्थी माटुंगा आणि दादर स्थानकादरम्यान रुळावर उतरलेत. मागील तीन तासांपासून लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. पण, अजूनही प्रशासन झोपलेलंच असल्याचं दिसतंय.
दोन्ही बाजूची वाहतूक बंद असल्यानं सकाळी सकाळी कामावर निघालेल्या लाखो मुंबईकरांची पुरेवाट लागलीय.
या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना, लवकरात लवकर रेल्वे वाहतूक सुरू करण्याचं रेल्वे प्रशासनाचं प्राधान्य असल्याचं रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी म्हटलंय.
कल्याण, डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, बदलापूर, अंबरनाथमध्ये सगळ्याच महत्वाच्या स्थानकांवर मोठी गर्दी उसळलीय. यामुळे सकाळी सकाळी मुंबईकडे येणाऱ्या हजारो प्रवाशांना नसता मनस्ताप सोसावा लागत आहे.