मुंबईत पावसाचा जोर कायम, सायन रेल्वे ट्रॅकवर पाणी
मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस बरसतोय.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस बरसतोय. कुर्ला, साकिनाका आणि चेंबूर परिसरात पावसाचा जोर पुन्हा वाढलाय. तर मुलुंड, भांडुप आणि विक्रोळीतल्या सखल भागात पाणी साचायला सुरूवात झालीय. वांद्रे, अंधेरीसह पश्चिम उपनगरात पावसानं हजेरी लावलीये.
मुसळधार पावसामुळे सायन स्टेशनजवळ रेल्वे ट्रॅकवर पाणी भरलं आहे. लोकल वाहतूक मात्र धिम्या गतीनं सुरू आहे. काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसामुळं काहीसा गारवा निर्माण झाल्यानं दिलासा मिळालाय. मुंबईत पुढच्या पंधरा तासांत आणखी मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय.