४८ तासात कोकणसह मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस
येत्या ३१ तारखेपर्यंत राज्यातला पाऊस असाच सुरू राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. येत्या ४८ तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई : येत्या ३१ तारखेपर्यंत राज्यातला पाऊस असाच सुरू राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. येत्या ४८ तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज आणि उद्या मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाडा आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजही पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे गणपतीपाठोपाठ गौरींच्या स्वागतालाही राज्यात वरुणराजाची हजेरी कायम राहणार असे दिसत आहे.
गेले दिवस दिवस मुंबईसह कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात चांगला पाऊस पडत आहे. पावसाने मुंबईत थोडीशी विश्रांती घेत दमदार बॅटिंग केलेय. तर कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर बीड, मराठवाड्यात चांगला पाऊस कोसळत आहे.