Maharashtra Rain | राज्यात केव्हा आणि कुठे पाऊस होणार? पाहा
पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीतील पहिल्या आठवड्यात राज्यात विविध ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.
मुंबई : शहरासह राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात थंड वातावरण आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळ्यात पारा 3 अशांच्या खाली घसरला आहे. तर मुंबईकर थंडी घालवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत. एकूण राज्यातील जनतेत लोकांमध्ये हुडहुडी पाहायला मिळतेय. त्यात आता पुन्हा मेघराजा बरसण्याची चिन्ह आहेत. हवामान खात्याने याबाबतचा अंदात वर्तवलाय. (rainfall is expected in maharashtra between February 2 and 4 according to meteorological department)
केव्हा आणि कोणत्या भागात मेघगर्जना?
पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीतील पहिल्या आठवड्यात राज्यात विविध ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यतेचा अंदाजही वर्तवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण
राज्यात कधी अस्मानी तर सुलतानी संकटांना सामोरे जावं लागतं. त्यात आधीच थंडीमुळे पिकांना फटका बसलाय. आता हवामान खात्याने वर्तवलेल्या या अंदाजाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.