मुंबई : मतदानाच्या दिवशी पाऊस पडेल, हा हवामान खात्याचा अंदाज लहरी पावसाने सोमवारी खोटा ठरवला. मात्र, रात्री आठनंतर पुन्हा ढगांच्या गडगडासह मुंबई शहरात पाऊस पडत होता. आता मतमोजणीच्या दिवशी म्हणजे २४ ऑक्टोबरला देखील पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणातील काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबईत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने दिवाळीवरही पावसाचे सावट असल्याची माहिती हवामान विभागाच्या वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी दिली आहे.


काल पाऊस पडल्याने आज पावसाचे सावट होते. मात्र, एकट्या मुंबई- उपनगरात दोन हजारांहून अधिक मतदान केंद्र ही तंबू उभारण्यात आले होते. यापुढे आवाहन आहे ते साचलेल्या चिखलाचे होते. अवेळी कोसळणाऱ्या पावसामुळं तंबूतील याच मतदान केंद्रांभोवती आता चिखल झाला आहे. तर, राज्यात निवडणूक यंत्रणेसमोरही पावसानं आव्हान निर्माण केले होते. मात्र पाऊस न झाल्याने मोठे संकट दूर झाले. तर काही ठिकाणी सकाळी पाऊस झाला. दरम्यान, पावसाने उघडीत दिल्याने मात्र काही ठिकाणी दिवसभर पाऊस झाला नाही.