मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे स्वर्गीय आनंद दिघे यांचा पुतळा ठाण्यात उभारला जावा अशी मोठी मागणी मनसेने महानगरपालिकेकडे केली आहे. मनसेचे ठाणे-पालघर जिल्ह्याअध्यक्ष अविनाश जाधव यांनी महानगरपालिकेकडे मागणी केली आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची आज जयंती आहे. यांच्या जयंती निमित्त मनसेने आनंद दिघे यांचा पुतळा उभारण्याची मागणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्यामध्ये चिंतामणी चौकात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील पुतळ्या प्रमाणे आनंद दिघे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा असं मनसेने म्हटलं आहे. आनंद दिघे हे शिवसेनेचे ठाण्यातील मोठे नेते होते. आनंद दिघे यांना मानणारा मोठा वर्ग ठाण्यासह महाराष्ट्रात आहे.


त्यामुळे त्यांचे कार्य जिवंत राहावे तरुणांना त्यांचा इतिहास माहीत पडावा यासाठी पुतळा उभारावा अशी मनसेची मागणी आहे. त्यामुळे आता मनसेच्या मागणीवर महापालिका काय निर्णय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 



दरम्यान,  दिव्ंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी करण्यात आले.