मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मला आनंद झाला होता. मात्र, त्यानंतर झालेले राजकारण दुर्दैवी होते, असे मत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले. ते रविवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सत्तास्थापनेच्या प्रयोगावर टीका केली. राज ठाकरे यांनी म्हटले की, विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याच्या दिवशी मला खूप आनंद झाला होता. कारण, जनतेने पक्षांतर केलेल्या बहुतांश नेत्यांना घरी बसवले. परंतु, यानंतर राज्यात झालेले राजकारण दुर्दैवी होते. एकासोबत निवडणुका लढवायच्या दुसऱ्यासोबत सत्ता स्थापन करायची, सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाने विरोधी पक्षात बसायचे हे दुर्देवी वाटते, असे राज ठाकरे यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे:

* '१४ वर्षांत रामायण घडले, एवढाच काळ वांद्रे-वरळी सागरी सेतू बांधयला लागला'
* जनमताचा धडधडीत अपमान होत असेल, तर लोकांनीच राज्यकर्त्यांना नाकारले पाहिजे- राज ठाकरे
* विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर आनंद झाला. कारण जनतेने पक्षांतर करणाऱ्यांना घरी बसवले- राज ठाकरे
* एकासोबत निवडणुका लढवायच्या दुसऱ्यासोबत सत्ता स्थापन करायची, सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाने विरोधी पक्षात बसायचे हे दुर्देवी वाटते- राज ठाकरे
* मनसेला अजूनही युतीचा स्पर्श झालेला नाही- राज ठाकरे
* व्यंगचित्रं काढण्यासाठी राहुल गांधींचा चेहरा चांगला नाही- राज ठाकरे
* व्यंगचित्र काढायला राहुल गांधींचा चेहरा चांगला नाही. राजीव गांधींंचा चेहरा चांगला होता. सोनिया गांधींच्या चेहऱ्यात गंमत आहे.- राज ठाकरे
* महाराष्ट्रात जातीच्या आधारावर राजकारण करण्याचे प्रयत्न- राज ठाकरे
* महाराष्ट्रात महापुरुषांना जातीची लेबलं लावली जातायतं- राज ठाकरे
* आपण सर्व गोष्टी जातीच्या चष्म्यातून पाहायला लागलो आहोत- राज ठाकरे