COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मराठी उद्योजकांनी आक्रमक व्हावे, असे महाराष्ट्र बिजनेस क्लबमध्ये मराठी उद्योजकांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले. पहा त्यांनी केलेल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे...


  • महानगर पालिकेत कंत्राटदार राजस्थान मधील एका गावातील आहेत. 

  • महाराष्ट्र ही भुमी आपण समज़ुन घेतली पाहीजे.

  • बाहेरून लोक आले ते व्यवसाय करत बसले आपले लोक नोकरी करत बसले.

  • महाराष्ट्रात सर्व सोयीसुविधा असल्याने बाहेरून लोक व्यवसायासाठी आले.

  • बाहेरील लोकांचा महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो.

  • महाराष्ट्रातील शहरांचे महत्व दुर्दैवाने मराठी लोकांना समजत नाहीयं.

  • शहरांमध्ये मराठी लोकसंख्या कमी होत आहे आणि बाहेरील लोकांची संख्या वाढत आहे.

  • मराठी माणसाला व्यवसायात आक्रमक व्हावे लागेल

  • महाबळेश्वर मध्ये ६०ते ७० % लोक हे गुजराती जातात.

  • आपल्या देशाच्या पंतप्रधानांना जर वाटत असेल की आपल्या राज्याचा विकास व्हवा त्यांच्या सतत मनात तेच असतं.

  • सर्व गोष्टी गुजरात मध्येच. बुलेट ट्रेन गुजरात मध्येच का ? दुसरीकडे का नाही ?

  • ठाणे जिल्ह्यात ७-८ महानगरपालिका आहेत ठाण्यात लोकसंख्या वाढत आहे.

  • ही शहरं जर मराठी माणसाच्या हातातून गेली तर तुम्हाला कोणी विचारणार सुद्धा नाही.

  • महाराष्ट्रातील वेगवेगळ्या स्थळांवर स्वःताचा ठसा उमठवा.

  • वेगवेगळ्या राज्याची भाषा वेगळी आहे, संस्कृती वेगळी आहे.

  • भारतातील प्रत्येक राज्य हा एक देश आहे.

  • महाराष्ट्रावरती मी एक डाॅक्युमेन्ट्री बनवतोय.

  • मी राजकीय पक्ष काढला या मध्ये पण चढ उतार होतात.

  • सर्वकाही कोकणात असताना तिकडे चायनिज ची दुकाने आहेत, कोकणात काय असं कमी आहे की तिकडे चायनिज दुकाने लागतात.

  • महाराष्ट्रातील ८ भारत रत्नांपैकी ७ भारत रत्न ही कोकणपट्ट्यातील आहेत आणि या पैकी चार भारतरत्न ही दापोलीतील आहेत.

  • मराठी उद्योजकांना पुढे घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्न करेन.