मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) पहिले राज्यव्यापी अधिवेशन आज मुंबईतल्या गोरेगावमध्ये होत आहे. गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे गुरूवारी सकाळी नऊ वाजल्यापासून मनसेच्या महाअधिवेशनाला सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी व्यासपीठावर शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन केले. त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करत राज ठाकरेंनी मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. भगव्या रंगावर शिवरायांची राजमुद्रा आणि त्याखाली भगव्या रंगाच्या अक्षरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं लिहिलेल्या मनसेच्या नव्या झेंड्याचं ढोल-ताशांच्या गजरात अनावरण करण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झेंड्याचं अनावरण झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष करण्यात आला. व्यासपीठाजवळ उपस्थित असलेल्यांनी मनसेचा नवा झेंडा जल्लोषात फडकवला. 


मनसेच्या झेंड्याचं अनावरण झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजित करण्यात आलं आहे. 


गोरेगावमध्ये राज्यभरातून मनसैनिक या मेळाव्यासाठी दाखल झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिवसभर याठिकाणी उपस्थित राहणार असून संध्याकाळी राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. 


महाअधिवेशनातील महत्त्वाचे मुद्दे - 


- राजमुद्रेसह मनसेचा भगवा झेंडा


-  मनसेच्या नव्या 'राज'मुद्रेचं अनावरण


- राज ठाकरे यांच्या हस्ते झेंड्याचं अनावरण


- बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन - राज ठाकरे


- राज ठाकरे व्यासपीठावर दाखल


- हिंदुत्वाचा मुद्दा काही नवा नाही - शर्मिला ठाकरे


- राज ठाकरे कुटुंबीयांसोबत अधिवेशनस्थळी दाखल


- राज्यभरातून अनेक कार्यकर्ते अधिवेशनासाठी दाखल


- डोंबिवलीतील कार्यकर्त्यांचा जल्लोष, बसमधून अधिवेशनासाठी रवाना



- आजचं अधिवेशन नवीन दिशा, नवीन उर्जा घेऊन येणार आहे - मनसे सरचिटनीस संदीप देशपांडे


- आज अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग होण्याची शक्यता


- माजी आ. हर्षवर्धन जाधव मनसेत प्रवेश करणार? 


- प्रकाश महाजनही मनसेत प्रवेश करणार?


- मनसेच्या व्यासपीठावर सावरकरांचा फोटो


- राज ठाकरे कृष्णकुंजवरुन रवाना 


या अधिवेशनात प्रमुख वक्ते आणि नेते यांची भाषणे, विविध विषयांवर पक्षाची काय भूमिका असली पाहिजे, त्याबाबतचे ठराव मांडले जातील. प्रत्येक ठराव मांडण्याची जबाबदारी एका नेत्यावर देण्यात आली आहे. त्या सूचक- अनुमोदन दिले जाईल. दुपारच्या जेवणानंतर काही वक्ते आणि नेते यांची भाषणे होतील. तिसऱ्या सत्रात राज ठाकरे यांचे भाषण होणार असून त्यात पक्षाची नवी दिशा, पक्षबांधणी, पक्षाचा नवीन झेंडा याबाबत राज ठाकरे मार्गदर्शन करतील.