मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे १ मे पासून आपल्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरूवात करणार आहेत, १ मे हा महाराष्ट्र दिन आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर मुंबईचा महाराष्ट्रात समावेश झाला, १ मे या दिवशीच,  राज ठाकरे आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात करणार आहेत. यावेळी राज ठाकरे पालघर येथून आपल्या दौऱ्याला सुरूवात करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हा दौरा आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा तर नाही ना? असा प्रश्न राजकीय मंडळींना पडला आहे. मात्र राज ठाकरे सतत राजकीय दृष्ट्या सक्रीय असल्याचं वर्षभरापासून दिसून आलं आहे. मनसेने मागील काही महिन्यांपासून शहरी आणि ग्रामीण सर्वच विषयांवर हात घातला आहे. 


मनसे या वर्षी सतत चर्चेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एलफिन्स्टन पुलावरील प्रवाशांची चेंगराचेंगरी नंतरचा मोर्चा आणि सभा असो किंवा फेरीवाल्यांविरूद्ध पुकारलेलं रणशिंग असो, मनसे मागील वर्षभरापासून सतत चर्चेत राहिली आहे. मनसेचा एकच आमदार आणि महापालिकेत सात नगरसेवक निवडून आले असले, तरी मनसे शिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा पूर्ण होत नसल्याचं दिसून येत आहे. 


मनसेचा आता शेतकरी धर्मही


समृद्धी महामार्गावरून शेतकऱ्यांची बाजू देखील मनसेने घेतलेली आहे. तसेच राज ठाकरे यांनी याबाबतीत शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासावरही मनसेने जोरदार आवाज उठवला आहे.