मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ठाकरी तोफ औरंगाबादमध्ये (Aurangabad) धडाडणार आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला अखेर परवानगी देण्यात आलीय. पोलिसांनी त्यांच्या सभेला सशर्त परवानगी दिलीय. त्यामुळे राज ठाकरेंची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार यावर शिक्कामोर्तब झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादच्या राज ठाकरेंच्या सभेला आता परवानगी मिळणार मिळाल्याने राज ठाकरे यांच्या या सभेची उत्सूकता राज्याच्या जनतेमध्ये आहे. राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 1 मे रोजी ही जाहीर सभा होणार आहे. पण राज ठाकरेंच्या सभेसाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.


या आहेत अटी शर्ती


- जाहीर सभा दिनांक ०१/०५/२०२२ रोजी 4.30 ते 9.45 या वेळेतच आयोजीत करावी. कार्यक्रमाचं ठिकाण आणि वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये.


-  सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी सभेला येतांना आणि परत जातांना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी. 


- सभेसाठी बोलावलेल्या सर्व वाहनांना पोलीसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करण्याचा आणि मार्ग न बदलण्याच्या सुचना द्याव्या. त्या वाहनांनी शहरात व शहरा बाहेर प्रवासा दरम्यान त्या त्या रस्त्यावर विहीत वेगमर्यादेचे पालन करावं. सभेला आलेल्या नागरीकांनी दोन चाकी, चार चाकी व इतर कोणतेही वाहन पाकींगसाठी निर्धारीत केलेल्या ठिकाणीच पार्किंग करण्याच्या सुचना द्याव्यात. 


- सभेसाठी येतांना अथवा परत जातांना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रॅली काढू नये. त्याच प्रमाणे राज ठाकरे यांना अधिकृत सुरक्षा पुरविण्यात आली असुन आयोजकांनी त्यांच्या सभेच्या ठिकाणी येण्याच्या व सभेवरून परत जाण्याच्या वेळी कोणतीही रैली काढु नये.


- कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये. पदार्थ बाळगू नये अगर प्रदर्शन करु नये व शस्त्र अट क्र. २,३,४ बाबत सभेत सहभागी होणाऱ्या नागरीकांना कळविण्याची जवाबदारी संयोजकांची राहील.


-   कार्यक्रमात स्वयंसेवक नेमण्यात यावेत. त्यांची नावे, मोबाईल नंबर तसेच सभेसाठी औरंगाबाद शहराच्या बाहेरुन निमंत्रीत करण्यात आलेल्या नागरीकांच्या वाहनांची शहर/ गावांना अनुसरुन संख्या, त्यांचा येण्याचा व जाण्याचा मार्ग येणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या हो माहीती सभेच्या एक दिवस अगोदर पोलीस निरीक्षक सिटीचौक यांचे कडे द्यावी.


- सभा स्थानाची आसन व्यवस्था कमाल मर्यादा १५००० इतकी असल्यामुळे त्याठिकाणी १५००० पेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोंधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार धरले जाईल. 


- सभास्थानी सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांनी निर्देशीत केलेल्या ठिकाणी मजबुत बॅरीकेटस उभारावं, सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरीकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य ती तपासणी (Frisking) करण्याचा अधिकार पोलीसांना राहील. यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी. 


- सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळत असणाऱ्या प्रथा परंपरा या वरून कोणत्याही व्यक्ती व समुदायाचा अपमान होणार नाही अगर त्याविरूध्द चिथावणी दिली जाणार नाही अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कोणीही करणार नाही, याची आयोजक व वक्त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी. सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपका बाबत सर्वोच्च न्यायालय निर्देश व ध्वनिप्रदुण (नियंत्रण व नियमन) नियम २००० नुसार परिशिष्ट नियम ३ (१), ४ (१) अन्वये. आवाजाची मर्यादा असावी. वरील अटींचा भंग केल्यास पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ च्या कलम १५ अन्वये ५ वर्ष इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची आणि रु.१,००,०००/- ( एक लाख फक्त) इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकते. 


- सदर कार्यक्रमा दरम्यान कुटल्याही अत्यावश्यक सुविधा उदा. शहर बस सेवा, अॅम्बुलन्स, दवाखाना, मेडीकल, विजपुरवटा, पाणीपुरवटा, दळव-वळण यांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.


- सभेच्या दिवशी वाहतुक नियमनासाठी या कार्यालयाकडून काढली जाणारी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३६ अन्वयेची अधिसुचना सर्व संयोजक, वक्ते व सभेला येणाऱ्या नागरीकांना बंधनकारक राहील.


-  सभेसाठी येणाऱ्या महिला व पुरुषासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी व स्वतंत्र स्वच्छतागृहची व्यवस्था करावी. 


-  सभेसाठी वापरण्यात येणारी विद्युत यंत्रणा, बॅरिकेट्स, मंडप, ध्वनिक्षेपक सुस्थीतीत असल्याची खात्री करावी व विद्युत यंत्रणेमध्ये काही बिघाड झाल्यास पर्यायी विद्युत यंत्रणेची (जनरेटरची) व्यवस्था अगोदरच करावी.


- सदर कार्यक्रमा दरम्यान मिटाई व अन्नदान वाटप होत असल्यास अन्न व मिटाईतुन कोणासही विषबाधा होणार नाही याची दक्षता घ्यावी,