मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाण्यातील उत्तरसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर सडकून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांची नावं घेऊन टीका केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रिया सुळे यांनी काही बोलायचं नाही, त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे असा घणाघात राज ठाकरे यांनी केला. अजित पवार यांच्या घरी रेड पडते,  पण तुमच्या घरी पडत नाही. याचं कारण मला कळेल का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. 


सुप्रिया सुळे यांचं उत्तर
राज ठाकरे यांच्या टीकेला खासदार सुप्रिया सुळे यांनी शेलक्या शब्दात उत्तर दिलं आहे. राज ठाकरे म्हणतात अजित पवारांच्या घरी रेड झाली पण त्यांच्या घरी रेड झालेली नाही, राज ठाकरे यांची माहिती अपूर्ण आहे. एखादी करमणूक असते किंवा एखादा सिनेमा असतो, त्यात थोडा मसाला असतो त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे एंटरटेनमेंट म्हणून बघा फारसं गांभीर्याने बघण्याची गरज नाही असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. 


राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाचा ९५ टक्के भाग हा राष्ट्रवादीवर केलं आहे. त्यामुळे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस राजकीय दृष्ट्या किती महत्त्वाचा आहे हे त्यातून नमुद होतं. राज ठाकरे यांच्या भाषणातील जे मुद्दे होते त्याचं आश्चर्य वाटलं. तो सगळा अटॅक हा वैयक्तिक होता.


देशासमोर, राज्यासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. आज महागाईचं खूप मोठं आव्हान आहे. त्यावर आम्ही सगळ्यांनीच बोलावं, कारण आम्ही राजकीय पक्ष आहोत. लोकप्रतिनिधीचं काम आहे ते. पण त्यांनी या विषयांवर भाष्य केलं. ते इतिहासात रमल्या सारखे वाटले, 


राज ठाकरे इतिहासात रमतात, त्यांनी इतिहास जरुर वाचावा, पण या देशाचं वास्तव बघावं, आज देशासमोर, महाराष्ट्रासमोर काय आव्हान आहे, महिलांचं महागाईने कंबरडं मोडलं आहे, युवांसाठी स्टार्टअप उपक्रम पुढे कसा नेऊ शकतो, यावर विचार करायला हवा, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 


आम्ही राजकारणात एकमेकांवर टीक करण्यासाठी येत नाही, मी काम धोरणात्मक काम करते, लोकांच्या आयुष्यात बदल करण्यासाठी काम करते, असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.