राज ठाकरे यांना अटक करा, अबू आझमी यांची मागणी
Abu Azmi on Raj Thackeray : राज्यात धार्मिक तेढ वाढविण्याचे काम मनसे प्रमुख राज ठाकरे करत आहेत. त्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली आहे.
मुंबई : Abu Azmi on Raj Thackeray : राज्यात धार्मिक तेढ वाढविण्याचे काम मनसे प्रमुख राज ठाकरे करत आहेत. त्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्याची मागणी केली आहे. जर तसे नाही झाले तर मंदिरात 'हनुमान चालीसा' लावा, असा आदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. त्यानंतर राज्यात हनुमान चालीसा लावण्यासाठी मनसे कार्यकर्ते सरसावलेत. (Raj Thackeray should be arrested for Religious rift : Abu Azmi)
त्यानंतर राज्यात भोंग विरुद्ध भोंग असे चित्र दिसून आले. राज्यात धार्मिक तेढ वाढवणारे राज ठाकरे यांना अटक करा, अशी मागणी अबू आझमी यांनी केली. आझमी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही मागणी केल्याचे आझमी यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा महत्वाचा वाटा आहे, असे आझमी म्हणाले.
लोकशाहीला धोका निर्माण काही लोक करत आहेत. नवी मुंबईत सानपाड़ा सेथे एक जमीन धार्मिक स्थळासाठी दिली आहे. पण लोकल लोक, शिवसेना आणि आरएसएसचे ह लोक विरोध करत आहे. अद्याप सुरक्षा दिली जात नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही सांगितले, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
राज ठाकरे सारख्यांना किंमत नाही. तेच लोक धार्मिक तेढ वाढत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना अटक करा, असे आझमी म्हणाले. ते पुढे म्हणाले, लाऊडस्पीकर मशिद किती वाजतो आणि इतर ठिकाणी किती वाजतो हे पाहा. राज ठाकरे यांची सभा शांतता क्षेत्र येथे झाली. त्यामुळे राज ठाकरेंवर कारवाई केली पाहिजे.