Raj Thackeray Live: आगामी महापालिका निवडणुकींचं (Municipal Electorate) बिगूल वाजण्याची दाट शक्यता असल्याने आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) मुंबई गटाध्यक्षांचा मेळावा आज पार पडला. त्यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी राज ठाकरेंनी (Maharastra Politics) चौफेर फटकेबाजी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 16 वर्षातील आंदोलनाची पुस्तिका काढणार असल्याचं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं. प्रत्येत गटाध्यक्ष हा राज ठाकरे असतो.  आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आंदोलनात मनसेचा स्टाईक रेट इतर पक्षांपेक्षा खूप चांगला आहे, असंही ते यावेळी म्हणाले. माझा जन्म कट्टर हिंदुत्वावादी घरात झालाय. समोरून आरे आलं तर त्याला कारे आलंच पाहिजे, असंही राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray) म्हणाले आहेत.


आमचं धोतर म्हटलं नाही का? वय काय बोलतो काय? राज्यपाल पदावर बसलात म्हणून मान राखतो, नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. राज्यपालजी त्यांना विचारा तुम्ही तुमचं राज्य सोडून महाराष्ट्रात का आला? महाराष्ट्र काय आहे हे कोश्यारींकडून ऐकायचं नाहीये. आजही प्रकल्प येणार असेल तर त्याचा पहिला पर्याय महाराष्ट्रच असतो, असंही राज ठाकरे (Raj Thackeray On Bhagat Singh Koshyari) यांनी म्हणाले आहेत.


आणखी वाचा - Raj Thackeray Live :एकनाथ शिंदेनी एका रात्रीत कांडी फिरवली आता ते फिरतायत सगळीकडे; उद्धव ठाकरेंना टोला


दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी एका रात्रीत जादूची कांडी फिरवली. स्वत:च्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात घेयचा आणि कोपऱ्यात बसायचं, हे असले तर धंदे मी नाही करत, असं म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. हिंदूत्व हिंदुत्व म्हणणारे कुठे गेले?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.