Raj Thackeray Live :एकनाथ शिंदेनी एका रात्रीत कांडी फिरवली आता ते फिरतायत सगळीकडे; उद्धव ठाकरेंना टोला

निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. कुणाला, मान्यता मिळणार कुणाला नाही मिळणार? चिन्ह कुणाला मिळणार? याबाबत त्यांच त्यांना डोकं खाजवू द्या. असं म्हणत राज ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. 

Updated: Nov 27, 2022, 07:45 PM IST
Raj Thackeray Live :एकनाथ शिंदेनी एका रात्रीत कांडी फिरवली आता ते फिरतायत सगळीकडे; उद्धव ठाकरेंना टोला title=

Raj Thackeray Live, मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे( MNS Chief Raj Thackeray) यांची तोफ आज पुन्हा एकदा धडाडली आहे. निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. कुणाला, मान्यता मिळणार कुणाला नाही मिळणार? चिन्ह कुणाला मिळणार? याबाबत त्यांच त्यांना डोकं खाजवू द्या. असं म्हणत राज ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. एकनाथ शिंदेनी रात्रीच्या रात्री जी काय कांडी फिरवली ती आता फिरतायत सगळीकडे. स्वत:च्या स्वार्थ आणि पैशासाठी कुणाचाही हात हातात घ्यायचा.  सत्तेसाठी कधी हा, कधी तो कुणासाबोतही जातात अस म्हणत राज ठाकरे यांनी नाव न घेता थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का? कधी भूमिका घेतलीच नाही. फक्त स्वार्थासाठी राजकारण केलं जातयं. कालपरवापर्यंत मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर पडायला लागले आहेत. मुख्यमंत्रीपदी असताना तब्येतीचं कारण सांगून घरात बसले. एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री कांडी फिरवली अन् आता हे सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणारा मी नाही असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

आता म्हणतात राज ठाकरे हिंदुत्ववादी झाले.  मी हिंदुत्ववादीच आहे आणि कट्टर मराठी कुटुंबात माझा जन्म झालाय. पाकिस्तानी कलाकारांनी  धुडगूस घालतला होते तेव्हा कुठे गेले होते हे हिंदुत्ववादी.  मनसेच्या आंदोलनामुळे पुन्हा पाकिस्तानी कलाकरांची भारतात येण्याची हिंमत झाली नाही असं राज ठाकरे म्हणाले.

मुंबईतील नेस्को ग्राउंडवर(nesco ground) मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा आयोजीत करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.