मुंबई: एल्फिन्स्टन दुर्घटनेचा निषेध म्हणून राज मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट मुख्यालय असा मोर्चा काढला आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मोर्चावर राज ठाकरे ठाम आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मोर्चा स्थळी जमा होत आहेत. साडे अकरानंतर मोर्चाला सुरुवात झाली. चर्चगेट मुख्यालयाला पोहोचल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांशी एक शिष्टमंडळ चर्चा करुन आपल्या मागण्यांचं निवेदन देईल.




यानंतर चक्क दोन ट्रकवरच स्टेज बांधण्यात येणार असून त्या ट्रकवरुनच राज ठाकरे आंदोलकांना संबोधित करणार आहेत. या मोर्चाला अनेक मराठी कलाकारांनी पाठिंबा दिला असून अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि जितेंद्र जोशी मोर्चात सहभागी होणार आहेत. 


एल्फिन्स्टन रोड स्टेशनवरील पुलावर चेंगराचेंगरी होऊन २३ प्रवाशांचा मृत्यू झाला. यानंतर जोपर्यंत मुंबई लोकल सुरक्षित होत नाही., तोपर्यंत बुलेट ट्रेन होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.