Raj Thackeray : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी पक्ष बांधणीवर पक्ष केंद्रीत केले आहे. (Maharashtra Politics News) त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी काही पदाधिकाऱ्यांना चांगलेच झापले. (Political News) तुम्हाला काम करायचे नसेल तर पदावरुन दूर व्हा, असे सांगत चालते व्हा, असाच इशारा दिला आहे. मुंबईतील वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मनसेची बैठक झाली त्यावेळी त्यांनी आपला संताप व्यक्त केला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai BMC Election) पार्श्वभूमीवर त्यांनी आज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.


पदाधिकाऱ्यांची केली कान उघडणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली. काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. योग्य पद्धतीने काम करायचं नसेल तर पदावरुन दूर व्हा, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. (अधिक वाचा - आता राज ठाकरे कोकण दौऱ्यावर)


जे पदाधिकारी विभाग पातळीवर योग्य पद्धतीने काम करत नाहीत, त्यांची यादी बनवण्याचे आदेश विभाग प्रमुखांना देण्यात आले आहेत. त्याचवेळी गट अध्यक्षांच्या नेमणुकी न झाल्यामुळे राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकांपर्यंत जाऊन त्यांची काम करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी केल्यात. .(अधिक वाचा - आमदार जितेंद्र आव्हाड अडचणीत, महिलेने केला गंभीर आरोप)


दरम्यान, आता राज ठाकरे हे कोकणातील जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहे. कोकण दौऱ्याची (Konkan Tour) सुरुवात ही डिसेंबपासून होणार आहे. (Maharashtra Political News Update) तसेच  राज ठाकरे राज्याच्या विविध भागांचा दौरा करणार आहेत. त्याची सुरूवात त्यांनी विदर्भ दौऱ्यापासून केली होती. आता राज ठाकरे विदर्भानंतर कोकण दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन