राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूक, भाजपची बैठकीत रणनीती
राज्यसभा आणि विधानपरिषद उमेदवारांची छाननी करण्यासाठी भाजपच्या प्रदेश संसदीय समितीची बैठक मुंबईत पार पडली.
मुंबई : पुढील काही आठवड्यात होणाऱ्या राज्यसभा आणि विधानपरिषद उमेदवारांची छाननी करण्यासाठी भाजपच्या प्रदेश संसदीय समितीची बैठक मुंबईत पार पडली. राज्यसभेच्या सात जागांसाठी मार्च मध्ये तर विधानपरिषदच्या नऊ जागांसाठी एप्रिल महिन्यात निवडणूक होणार आहे. यामध्ये राज्यसभेच्या तीन तर विधानपरिषदच्या तीन जागांवर भाजपचा विजय निश्चित आहे. विधानपरिषदच्या चौथ्या जागेसाठी उमेदवार उतरवण्यासाठी भाजप विचार करत आहे.
या सर्व जागांसाठी एकूण ४० जणांनी अर्ज केले होते. याबाबत नावांची शिफारस प्रदेश भाजप हे केंद्रीय नेतृत्वाला करणार आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीत डावललेल्या आणि पराभूत नेत्यांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार केंद्रीय नेतृत्वाला सोपवण्यात आलेले आहेत.
केंद्रात तसेच राज्यातील विधिमंडळात नव्या आणि अनुभवी नेत्यांचा मेळ बसावा यासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रकाश मेहता यांच्या पुनर्वसनाबाबत केंद्रीय नेतृत्व लवकरच घेणार निर्णय आहे. सात किंवा ८ मार्चला दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
0