मुंबई : राज्यसभेच्या ( Rajya Sabha) सात जागांसाठीची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली  आहे. कारण एकही जादा अर्ज आलेला नाही. त्यामुळे ही निवड बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. १८ मार्चला या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र राज्यातल्या (Maharashtra) राज्यसभेच्या सात जागांसाठी सातच अर्ज आल्याने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड होईल असे स्पष्ट झाले आहे. राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार, फौजिया खान, काँग्रेसतर्फे राजीव सातव, भाजपतर्फे उदयनराजे भोसले, रामदास आठवले आणि भागवत कराड आणि शिवसेनेतर्फे प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर या सात जणांव्यतिरीक्त इतर कोणीही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे या सात जणांची निवड बिनविरोध होईल, असं स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार  राज्यसभेसाठी मतदान होऊन निकाल जाहीर होणार होते. त्यामुळे त्याच दिवशी या उमेदवारांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. 


या सात जणांचे अर्ज दाखल


शरद पवार आणि फौजिया खान (राष्ट्रवादी),Sharad Pawar and Fauzia Khan (NCP), राजीव सातव (काँग्रेस),  Rajiv Satav (Congress),  प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना), Priyanka Chaturvedi (Shiv Sena), रामदास आठवले (रिपब्लिकन पक्ष), Ramdas Athawale (Republican Party), उदयनराजे भोसले आणि डॉ. भागवत कराड (भाजप), Udayan Raje Bhosale and Dr. Bhagwat Karad (BJP) 


0