मुंबई: रक्षा बंधानाला बहीण भावाला किती रुपयांची राखी बांधते त्यावर ओवाळणी ठरते असं मजेत म्हणतात. पण विचार करा लाखो रुपयांची राखी बहिणीला ओवाळणी कितीची मिळेल? रक्षाबंधन हा भावा-बहिणीच्या नात्यातील एक गोड क्षण. बहीण भावाला राखी बांधून ओवाळते आणि भाऊ तिला रक्षण करण्याचं वचन देतो. सध्या मार्केटमध्ये चर्चा आहे ती लाखो रुपयांच्या राखीची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1.3 लाख रुपयांना चक्क राखी मिळते. ऐकून तुम्हालाही मोठा धक्का बसला ना. सामान्य राखीबरोबरच सोन्याची आणि हिऱ्यांच्या राखीचीही मोठ्य़ा प्रमाणात विक्री होत आहे. महाग असूनही दरवर्षी अशा राख्यांना खूप मागणी असते. त्यामुळे अशा प्रकारची राखी घेण्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानातही गर्दी होताना पाहायला मिळत आहे. 


अनेक महिला ज्वेलर्सकडे कस्टमाइज डिझाइन शोधत असतात. अनेकदा अशा डिझाइन्स महागही मिळतात. ज्यामध्ये सोनं, हिरे आणि चांदीचा वापर करण्यात आलेला असतो. अशा राख्या खरेदी करताना पैशांचा विचार केला जात नाही. लाखोंच्या घरात जरी या राख्यांची किंमत असेल तरी महिला घेण्यासाठी तयार होतात असं ज्वेलर्सही म्हणतात. 


झवेरी बाजारातील द्वारकादास चंदुमल ज्वेलर्सचे संचालक निशांत तुलसियानी यांच्या म्हणण्यानुसार एका ग्राहकाला सोनं-हिऱ्यांनी सजवलेली राखी हवी होती. त्या राखीची किंमत सुमारे 1.3 लाख रुपये होती. आतापर्यंत विकलेल्या राखीमध्ये सर्वात महागडी राखी ही होती असा त्यांनी दावा केला आहे. 


गेल्या दोन आठवड्यांत अशा प्रकारच्या सोनं, चांदीच्या राख्यांची विक्री झाली आहे. अनेक ऑर्डर्स ह्या कस्टमाइज होत्या. मात्र आतापर्यंत सर्वात महागडी राखी ही 1.3 लाख रुपयांना विकल्याचंही या ज्वेलरने सांगितलं आहे. रक्षाबंधनाला सोन्या-चांदीची मागणी वाढत असल्याचंही ज्वेलर्सचं म्हणणं आहे.