Raksha Bandhan : रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) सण जवळ आला आहे. आपल्या बहिणींना आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी खूप उत्सुकता असते. पण बहिणींअभावी हा सण साजरा करू शकत नसलेले अनेकजण इतरांच्या मनगटावर राखी (Rakhi) बांधताना पाहून दुःखी होतात. परंतु आजकाल सोशल मीडियाने सर्व काही सोपे केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही जण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी बहिणींचा शोध घेत आहेत. असाच काहीसा प्रकार मुंबईतून समोर आला आहे. 


मुंबईतली एका तरुणाने रक्षाबंधनाच्या दिवशी एकटं वाटू नये म्हणून चक्क सोशल मीडिया बहिणींची शोध घेतला आहे. मात्र एका डेटिंग अ‍ॅपवरुन तरुणाने आपल्या बहिणींचा शोध घेतला आहे.  प्रेयसी शोधण्याच्या डेटिंग अ‍ॅपवरुन तरुणाला रक्षाबंधनाच्या दिवशी चक्क एक नव्हे तर दोन बहिणी मिळाल्या आहेत.


रक्षाबंधनाच्या दिवशी बहीणशोधण्यासाठी तरुणाने टिंडर (Tinder) डेटिंग अॅपवर आपला बायो बदलला. त्यानंतर त्याला रक्षाबंधानसाठी दोन बहिणी मिळाल्या आहेत.


रक्षाबंधनासाठी बहीण असावी यासाठी तरुणाने थेट टिंडरवर रक्षाबंधनासाठी बहीण शोधत आहे, असा बायो लिहिला होता. त्यानंतर त्याचे दोन मुलींसोबत त्याचे प्रोफाइल मॅच झाले आणि या तरुणाला दोन बहिणी मिळाल्या आहेत. 


त्याच वेळी, या तरुणाने Reddit वर एका पोस्टमध्ये टिंडरचे आभार देखील मानले आहेत. "'टिंडरचे आभार! आता मला एक नाही तर दोन बहिणी आहेत. टिंडरने माझी या दोन बहिणींशी ओळख करून दिली.  यावर्षी आम्ही तिघेही रक्षाबंधनाचा सण एकत्र साजरा करणार आहोत आणि भेटवस्तू देण्याची योजनाही आखत आहोत. रक्षाबंधनाला आयुष्यभर बहिणी नसल्यामुळे  खूप एकटे वाटायचे. प्रत्येकाच्या मनगटावर राखी बांधलेली पाहून मी दु:खी व्हायचो पण आता टिंडरने दोन बहिणी दिल्या आहेत," असे या तरुणाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.



डेटिंग अॅपवर घराचाही शोध


दरम्यान, टिंडर या डेटिंग अॅपवर केवळ बहिणीच नाही तर लोक घरही शोधत आहेत. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने मुंबईत घर शोधण्यासाठी डेटिंग अॅप बंबलची मदत घेतली होती. केरळमधील या व्यक्तीची पोस्टही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती.